माणदेशी रेडिओ ने CLP प्रेक्षपन.
CEMCA आणि माणदेशी तरंग वाहिनी सामुदायिक रेडिओ केंद्र म्हसवड यांच्या मध्ये श्रीमंती रुक्मिणी वेमराजू यांच्या मार्गदर्शनाखाली CLP(community learning programme)तयार करून त्याचे प्रेक्षपन रेडिओ वरून करण्याचे नियोजन 2010-2011 या कालावधी साठी करण्यात आले. माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ कार्यक्षेत्रासाठी हे रेडिओ कार्यक्रम तयार येत असल्याने या क्षेत्रातील समुदायाचा आणि त्यातही महिलांचा सहभाग अपेक्षित होता. त्या दुष्ट्रीकोनातून माणदेशी तरंग वाहिनी रॅडिओचे कार्यक्रम एकणाऱ्या क्षेत्रातील महिलांसाठी CLP रेडिओ कार्यक्रमाची निर्मिती कशी करता येईल,या उद्देशाने CEMCA च्या वतीने 28 माणदेशी महिलांना गोंदवले बु.येथे 3 दिवसांचे विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात तयार होणारे रेडिओ कार्यक्रम CLP हे माणदेशी समुदायाचे निगडित असले पाहिजे,त्यांच्या समस्यांचे उकल करणारे असले पाहिजे. रेडिओ कार्यक्रम एकसुरी किंवा एकाच आवाजाचे नसावेत,CLP रेडिओ कार्यक्रमाचे स्वरूप मॅगझीन प्रकारचे असावे. CLP मध्ये तज्ञ व्यक्ती बरोबरच समुदायकातील विविध प्रकारच्या व्यक्तीचा सहभाग ...