माणदेशी रेडिओ ने CLP प्रेक्षपन.
CEMCA आणि माणदेशी तरंग वाहिनी सामुदायिक रेडिओ केंद्र म्हसवड यांच्या मध्ये श्रीमंती रुक्मिणी वेमराजू यांच्या मार्गदर्शनाखाली CLP(community learning programme)तयार करून त्याचे प्रेक्षपन रेडिओ वरून करण्याचे नियोजन 2010-2011 या कालावधी साठी करण्यात आले.
माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ कार्यक्षेत्रासाठी हे रेडिओ कार्यक्रम तयार येत असल्याने या क्षेत्रातील समुदायाचा आणि त्यातही महिलांचा सहभाग अपेक्षित होता.
त्या दुष्ट्रीकोनातून माणदेशी तरंग वाहिनी रॅडिओचे कार्यक्रम एकणाऱ्या क्षेत्रातील महिलांसाठी CLP रेडिओ कार्यक्रमाची निर्मिती कशी करता येईल,या उद्देशाने CEMCA च्या वतीने 28 माणदेशी महिलांना गोंदवले बु.येथे 3 दिवसांचे विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात तयार होणारे रेडिओ कार्यक्रम CLP हे माणदेशी समुदायाचे निगडित असले पाहिजे,त्यांच्या समस्यांचे उकल करणारे असले पाहिजे.
रेडिओ कार्यक्रम एकसुरी किंवा एकाच आवाजाचे नसावेत,CLP रेडिओ कार्यक्रमाचे स्वरूप मॅगझीन प्रकारचे असावे. CLP मध्ये तज्ञ व्यक्ती बरोबरच समुदायकातील विविध प्रकारच्या व्यक्तीचा सहभाग असावा.
समुदायातील अडचणी व समस्यांवर CLP मधून प्रकाश झोत पडावा. आहार जागरूकता,विविध रोगांची माहिती लक्षणे, प्रसार प्रतिबंधक उपाय पोषक आहार घटक ,व्यायीउपयुक्तता आणि व्यायमाचे महत्व या बाबींना अनुसरून मार्गदर्शन करण्यात यावे.
गोंदवले बु.मधील या प्रशिक्षण वर्गात उपस्थित महिलांना श्रीमंती रुक्मिणी वेमराजू, श्री. संजय चांदेकर FTII पुणे,श्री. युवराज जाधव वसुंधरा बारामती यांनी तज्ञ म्हणून मार्गदर्शन केले.
CLP कार्यक्रम निर्मिती करण्यासाठी म्हसवड मधील वैदयकिय संघटनेच्या सदस्य बरोबर चर्चा केली.तसेच त्यांनी याबाबत सहकार्य करण्याची भूमिका मांडली.
CEMCA आणि श्रीमंती. रुक्मिणी वेमराजू यांनी केलेल्या सूचना नुसार सुरुवातीत 40 CLP तयार करण्याचे नियोजन करण्यात आले.
यानंतर निवडक तीन महिलांना सौ.निर्मला गोंजारी, सौ. दोरगे,सौ.वनमाला लाटणे यांना वसुंधरा वाहिनी बारामती येथे CLP रेडिओ कार्यक्रमाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.
CLP कार्यक्रम निर्मिती करण्यासाठी म्हसवड मधील वैदयकिय संघटनेच्या सदस्य बरोबर चर्चा केली.तसेच त्यांनी याबाबत सहकार्य करण्याची भूमिका मांडली.
त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड ,ग्रामीण रुग्णालय दहिवडी,गोंदवले खु.आणि क्षयरोग विभाग,
जिल्हाक्षयरोग अधिकारी,जिल्हा हिवताप अधिकारी यांचे CLP निर्मितीसाठी मोठे सहकार्य मिळाले.
CEMCA च्या वतीने आणखी30 CLP रेडिओ कार्यक्रम तयार करण्याची संधी माणदेशी तरंग वहिनीला देण्यात आली.या CLP रेडिओ कार्यक्रम निर्मिती मध्ये DR. श्रीमती हसुमती छेडा मुंबई, आणि Dr. धिरज छेडा मुंबई यांचे सहकार्य मिळाले.
CLP कार्यक्रम तयार होतंच हे रेडिओ कार्यक्रम माणदेशी समुदायसाठी माणदेशी तरंग वाहिनीवरून 'रेडिओ डॉक्टर'हे नाव देऊन प्रसारित करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पुनः प्रसारण करण्यात आले.
CLP कार्यक्रमच्या प्रेक्षपन नंतर समुदायातील माणदेशी तरंग वाहिनीचे कार्यक्रम एकणाऱ्या श्रोत्याकडून CLP रेडिओ कार्यक्रमात मैरपिक स्वरूपात प्रतिक्रियाचे संकलन माणदेशी तरंग वाहिनी मार्फत करण्यात आले.तसेच या संपूर्ण अहवालाचा आणि CLP प्रक्षेपणाचा CEMCA कडे पाठवण्यात आले.
या उपक्रम द्वारे माणदेशी तरंग वहिनीला पुढील गोष्टी प्राप्त झाल्या-
1.CLP रेडिओ कार्यक्रम निर्मितीचे मार्गदर्शन.
2.श्रवणीय रेडिओ कार्यक्रमाची निर्मिती.
3.माणदेशी समुदायात CLP रेडिओ कार्यक्रमा द्वारे रेडिओ आरोग्यविषयक जागरूकता.
4.माणदेशी समुदायातील डॉक्टर माणदेशी तरंग वाहिनीशी जोडले गेले.
5.CLP कार्यक्रम निर्मिती ,प्रशिक्षण, feedback संकलन,आणि उपक्रमाचा अहवाल तयार करन्याचा मोठा अनुभव माणदेशी तरंग वहिनीला मिळला.
6.श्रोत्या वर्गात वाढ झाली.
7.माणदेशी तरंग वहिनीला अर्थसाहाय्य प्राप्त झाले.
8.असे उपक्रम पूर्ण करण्याची क्षमता माणदेशी तरंग वाहिनीच्या टीम मध्ये झाली.
9.CEMCA च्या CLP निर्मितीचा हा उपक्रम दिल्याबद्दल आणि श्रीमंती. रुक्मिणी वेमुराजू यांच्या मार्गदर्शना बद्दल खूप खूप धन्यवाद!
-Writer and blogger-Akash Raychand Shinde.

Comments