माझा प्रेरणादायी प्रवास
जगात एकीकडे कोरोनाच्या महामारीमूळे जवळ-जवळ सगळ्यांच्या मनात भीती आणि काहूर हे होतंच.सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊन च्या काळात मी घरीच थाबंलो होतो कारण तेव्हा घरी थांबणं हेच खऱ्या अर्थाने माझ्यासाठी secure होतं आणि तसेच माझ्या कुटूंबासाठी सुध्या. तीन माहिनाच्या काळात असें काही म्हणावें तसे दिवे नाहींत लावले. पण हा एक मात्र खास वैशिष्ट्य नमूद करू इच्छूतो कि भलें मला कॉलेज ची lecture करताना इंटरनेटची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आली होती त्यात त्या covid-19 ची भीतीने मनात काहूर माजले होतें. आणि माझी अवस्था अत्यंत संवेदनशील बनली होती.तरीपण मी हार नाय मानली.शक्य होती तेवडी मी कॉलेज lecture हि रानाच्या वस्तीला जाऊन इंटरनेट समस्या निर्माण न व्हावी म्हणून चालतं-चालत, तसेच झाडावर चडून शक्य झाली तेवढी lecture हि केलीच. आणि का करणार नाही आमच्या गुरुदेव एक उपदेश दिला होता की कोणतेही फायद्याची गोष्ट साध्य करण्यासाठी जुगाड हे केलंच पाहिजे. अंततः जून महिना हा तसा नवीन सोनेरी आशेची किरणे घेऊन आला. एक तारखेला वडील अचानक म्हणाले की,"आकाश चल आपण म्हसवड...