माझा प्रेरणादायी प्रवास

‌जगात एकीकडे कोरोनाच्या  महामारीमूळे जवळ-जवळ सगळ्यांच्या मनात भीती आणि काहूर हे होतंच.सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या लॉकडाऊन च्या काळात मी घरीच थाबंलो होतो कारण तेव्हा घरी थांबणं हेच खऱ्या अर्थाने माझ्यासाठी secure होतं आणि तसेच माझ्या कुटूंबासाठी सुध्या. तीन माहिनाच्या काळात असें काही म्हणावें तसे  दिवे नाहींत लावले. पण हा एक मात्र खास वैशिष्ट्य नमूद करू इच्छूतो कि  भलें मला कॉलेज ची lecture करताना  इंटरनेटची समस्या खूप मोठ्या प्रमाणात  आली होती त्यात त्या covid-19  ची भीतीने मनात काहूर माजले होतें. आणि माझी अवस्था अत्यंत संवेदनशील बनली होती.तरीपण मी हार नाय मानली.शक्य होती तेवडी मी कॉलेज lecture हि  रानाच्या वस्तीला जाऊन इंटरनेट समस्या निर्माण न व्हावी म्हणून चालतं-चालत, तसेच झाडावर चडून शक्य झाली तेवढी lecture हि केलीच. आणि का करणार  नाही आमच्या गुरुदेव एक उपदेश दिला होता की कोणतेही फायद्याची गोष्ट साध्य करण्यासाठी जुगाड हे केलंच पाहिजे. अंततः जून महिना हा तसा नवीन सोनेरी आशेची किरणे घेऊन आला. एक तारखेला वडील अचानक म्हणाले की,"आकाश चल आपण म्हसवड मधून किनारा  बाजार करून येऊ." तेवढ्यात मी पटकन बोललो,"कोरोना न बाहेर थैमान घातलंय,मग कश्याला जायचं म्हसवड ला ."वडील रागाने बोलले खायचं काय मग? त्यांचं बी खरंय हाय म्हणा, आणि नाना म्हणजे मी वडिलांना नाना म्हणतो नानासोबत आम्ही आमच्या गाडीवर म्हसवडला गेलो. बाजार केला आणि घराच्या वाटेला निघलो होतो तोवर डोळ्याजवळ माणदेशी महिला बँक आणि माणदेशी रेडिओ केंद्र याची बिल्डिंग दिसली आणि पटकन मनात विचार आला की आपण जर कॉलेज सुरु होई पर्यंत जर माणदेशी तरंग वहिनीला इंटर्नशिप केली तर किती बरं होईल अनुभव पण येईल त्याच बरोबर माझ स्वतःच नेटवर्किंग पण वाढेल .मग मी पटकन ऑफिस मध्ये गेलो.ऑफिस मध्ये सचिन मेनकुदळे म्हणून सर बसले होते ते रेडिओ केंद्राचे सहायक निर्देशक म्हणून काम करत होते. त्यांचं कुणासोबत तर कॉल चालू होता.त्यांनी मला बसायला सांगितले आणि पाच मिनिटांनंतर त्यांनी मला आत कॅबिन मध्ये बोलवलं.त्यांनी म्हणाले,"रेडिओ मध्ये इंटर्नशिप हवी आहे का ? तस मी पटकन उत्तर दिले,"हो मला आमचं कॉलेज सुरु होई पर्यंत पाहिजे होती".ते म्हणाले,"काय  काय येत तुला, याच्या आधी कधी रेडिओ मध्ये इंटर्नशिप केलीये का?असं बोलताच माझी बोलती बंद झाली.डोंबलाला! मी कश्याला कधी रेडिओ  ऐकला नव्हता आणि रेडिओ मध्ये इंटर्नशिप कशी करणार. मी पटकन सावध होऊन म्हणालो मी mass media चा student आहे, आताशी first year पूर्ण केले आहे. रेडिओ मध्ये काम नाही केलं पण मुक्तागिरी न्यूस चॅनेल सातारा येथे एक महिन्याची इंटर्नशिप केली आहे.तसं त्यांनी माझ्या बोलण्याला होकार दिला आणि ते म्हणाले सुरुवातीला आठ दिवस field work करावं लागेल आणि नंतर मग स्टुडिओ मध्ये R. J म्हणून संधी उपलब्ध करून  देण्यात येईल. बोल मग आहे का तुझी तयारी filed work करायला.तसे मी पटकन क्षणाचा हि विलंब न करता उत्तर दिले, "चालेल मी करेन filed work."त्यांनी माझा एवढ्या covid-19 च्या महामारी  च्या काळात सुद्धा  field work करायला राजी होण्याचं आत्मविश्वास पाहून  कदाचित त्यांना  नवल च वाटले असेल त्यामुळे तर पटकन म्हणाले उद्यापासून आठ वाजता ऑफिस मध्ये हजर हो,peyment चं नंतर बगू तुझं कसे काम आहे ते पाहून. मी हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आठ वाजता ऑफिस मध्ये हजर झालो. सुरुवातीच्या दोन दिवस सगळी रेडिओ केंद्र विषयी माहिती घेतली. तिसऱ्या दिवसापासून field work करायला जायला लागलो.filed work मध्ये मी सात गावात जाऊन  रेडिओ एकणाऱ्या श्रोत्यांचं  feedback घेयाला लागलो.श्रोत्यांच्या feedback वरून असं लक्ष्यात आले,महिला वर्गातील श्रोत्यांना कोरोना विषाणूची  माहिती पुरेपूर मिळत नव्हती म्हणून मी मेंनकुदले सर ना सुचवलं कि आपण 'मिशन कोरोना'हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करू म्हणजे जेणेकरून  वयस्कर आणि महिला  श्रोत्या  वर्गाला कोरोना विषाणूची अपडेट मिळत राहतील.आणि विशेष म्हणजे त्यांनी माझी प्रशंसा करून उपक्रम पण सुरु केला. आणखी एक गोष्ट श्रोत्यांच्या feedback वरून   लक्ष्यात  आली की शासनाने ओनलाईन शिक्षणाची प्रणाली सुरु करण्यात येणार होती पण त्याचा वास्तविक पाहता उपयोग च नव्हता कारण ग्रामीण भागात इंटरनेट ची समस्या असल्यामुळे  खेड्या पाड्यातील विद्यार्थ्यांना  ओनलाईन शिक्षण घेणं हे अशक्य होते.मग मी लगेच या समस्यांचे समाधान करण्यासाठी  माणदेशी तरंग वाहिनी मध्ये श्रीमती चेतना सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 'माझी शाळा'हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला.या उपक्रमात आम्ही सर्व विषय शिक्षकांना आमंत्रण करून पहिली ते दहावी च्या वर्गातील पाठ्य-पुस्तकातील धडे शिकवू लागलो.तसेच मी आणि माझ्या सोबत असणाऱ्या कर्मचारी वर्गानी एक रेडिओ ऑडिओ documentary फिल्म तयार केली.Documentary film अशी होती की एक अंधः महिला होती आमच्या मान तालुक्यातील मासाळवाडी या गावात ती महिला राहत होती.ती एक जन्म ताच अंधः होती.त्या महिलेला माणदेशी तरंग वाहिनी ने  माहिती मिळण्यासाठी व गाणी ऐकण्यासाठी एक  रेडिओ फ्री मध्ये दिला होता. Documentary फिल्म चा असा विषय होता की रेडिओ मुळे त्या महिलेच्या जीवनात काय बदल झाला.त्याबद्दल  त्या महिलेचा interview आणि feedback घेयचा होता. त्याचवेळी मला रेडिओ माध्यम च  भूमिकेचं महत्व आयुश्यात पहिल्यांदाच समजले. आणि आता मी वेगवेगळ्या समूहातील रेडिओ केंद्रातील लोकांशी zoom meeting वर वेबिनार पण करतो खूप काही शिकायला आणि प्रोजेक्ट हाताळायला मिळते. आणि महत्वाचं म्हणजे आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास मनामध्ये  निर्माण होतो आणि विशेष म्हणजे  आता R.J  म्हणून माणदेशी तरंग वाहिनी मध्ये इंटर्नशिप करतोय.माणदेशी रेडिओ मध्ये R.J  हि जबाबदारी पार पडताना मी श्रोत्यासाठी पेपर वाचनीय कार्यक्रम करतो तसेच motivated आणि inspiration  कथा पण सांगतो. मला खूप साऱ्या श्रोत्याकडून प्रशंसा पण मिळते.मला हे करताना खूप अभिमान वाटतोय कि माझ्या क्लास मध्ये माझं राहणं  आणि बोलणं साद असल्यामुळे माझ्यावर  हासणाऱ्या  आणि मला कमी समजणाऱ्या मुलांपेक्षा मी एक पाऊल पुढे आहे याचा मला सार्थ  खूप खूप अभिमान आहे. आणि मी ब्लॉग पण लिहतो,मी लिहलेले ब्लॉग पण तुम्ही वाचत रहा आणि तुमच्या मित्रांना पण share करा.आतापर्यंत माझ्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व वाचकाच्या मी ऋणात राहू इच्छतो.असंच माझ्यावर प्रेम  आणि आशीर्वाद राहुद्या.



                   -Blogger- Akash Raychand Shinde

Comments

Unknown said…
Osm re khup khup bhari lihilay khup avdl
Unknown said…
Nice keep it up ..best luck for future sir...

Popular posts from this blog

'My radio School' is an innovative initiative of Mandeshi Radio.

How to Improve your listening skills.

'माझी शाळा' माणदेशी रिडिओचा नाविन्यपूर्ण उपक्रम.