'माझी शाळा' माणदेशी रिडिओचा नाविन्यपूर्ण उपक्रम.
'माझी शाळा' माणदेशी रिडिओचा नाविन्यपूर्ण उपक्रम.
जगात एकीकडे कोरोनाच्या महामारीमुळे जवळ-जवळ सर्व आर्थिक शॆत्रांचे खूप मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि ते सुरु राहावें यांसाठी online शिक्षणाचे सर्वत्रीकरण होऊ लागले आहे.त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना हि निर्देशीत शाषना कडून केल्या गेल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ओनलाईन शिक्षणाचा पर्याय म्हणुन पाहण्याची गरज आहे.
इ-मार्केटर या संस्थाने केलेल्या सर्वेक्षण नुसार ग्रामीण भागात इंटरनेट समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि तसेच हि समस्या लक्ष्यात घेऊन माण-तालुक्यातील म्हसवड मधील माणदेशी तरंग वाहिनी ने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
माणदेशी फौंडेशच्या अध्यक्षा श्रीमती. चेतना सिन्हा यांच्या कल्पनेतून आणि प्रभात सिन्हा अध्यक्ष माणदेशी चॅम्पियन यांच्या मार्गदर्शनाखाली माणदेशी वाहिणीच्या माध्यमातून 'माझी रेडिओ शाळा' या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण होत आहे.
बहुतांश विद्याथीकडे स्मार्ट मोबाईल नसल्याने त्यांचे शालेय नुसकाण होत आहे. यासाठी रोज सकाळी दहा ते अकरा यावेळेत माणदेशी रेडिओ च्या माध्यमातून खास शालेय विद्यार्थीसाठी कार्यक्रमाचे प्रसारण होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील मुलांच्या पाठ्य- पुस्तकातील धडे शिकवण्यात येणार आहेत.तसेच इतर विषय शिक्षिका-शिक्षक रेडिओ स्टुडिओ मध्ये येहून रिडिओच्या माध्यमातून सर्व विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.रेडिओ FM brand 90.4MHz वर सुद्धा आपल्या मोबाईल वर हि अगदी सहज पणे ऐकू शकता.माणदेशी संस्कृती आणि चालीरीती जगभरात पोहोचवण्यासाठी 2009 साली माणदेशी तरंग वाहिनी अर्थात कॅम्यनिटी रिडिओ केंद्र सुरू करण्यात आलं होतं.विशेष म्हणजे माहिलांद्वारे चालवण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिले रेडिओ केंद्र आहे.
वास्तव पाहता ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या खूप मोठ्या प्रमाणात असते,काही गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल नसतो. तर काही अंधः विद्यार्थ्यासाठी कोणतीही माहिती, घडामोडी,शालेय शिक्षण या संदर्भत ऐकण्यासाठी रिडिओ हे माध्यम खूप आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन माण देशी तरंग वाहिनीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे.


Comments